Sunday, December 4, 2011

चला क्रांती घडवू या

सध्या काळा पैसा ’आत ’ आणा व भ्रष्टाचाराला ’बाहेर’ घालवा, अशा मागण्यांनी जोर पकडला आहे. अशी आंदोलने ज्यांनी सुरु केली आहेत, त्यांची चरित्रे स्वच्छ व पारदर्शक आहेत त्यामुळे त्या व्यक्ती दुसऱ्यांकडे बोट दाखवू शकतात. तीन बोटे त्यांच्या स्वत:कडे निर्देश करीत असलीत तरी ती बोटे त्यांच्यावर आरोप करीत नाहीयेत.
पण सर्व जनांचे तसे नाही. दुसऱ्यावर आरोप करतांना त्या तीन बोटांची जाणीव ठेवलीच पाहिजे, नाही का! माझे गीत सर्वजनांना संबोधित करते. भ्रष्टाचाराचे उच्चाटन स्वत:पासूनच करायला पाहिजे.

चला क्रांती घडवू या

खपतील जीव ओतुनी धरतीत पेरुनी प्राण ।
मातीत घाम मिसळोनी मातीत पिकविती स्वर्ण ॥
चला कृषि क्रांती घडवू या, चला कृषि क्रांती घडवू या ॥१॥
कौशल्य जिद्द जोडुनी गुणवत्तेस वाढवू या ।
आलस्य स्वार्थ त्यागुनी उत्पन्न वाढवू या ॥
उद्योग क्रांती घडवू या, उद्योग क्रांती घडवू या ॥२॥
श्रीमंत सेठ उद्योगी सत्कर्मी राबवती लक्ष्मी ।
कायद्यात राहुनी प्रगतीची शिडी अभिमानी ॥
आर्थिक क्रांती घडवू या, आर्थिक क्रांती घडवू या ॥३॥
तळहाती शिर घेऊनी करतील रिपुवध रणभूमी ।
बाजी जिवाची लावूनी लढतील सैनिक सरहद्दी ॥
चला स्वातंत्र्य जपुनी ठेवू या, चला स्वातंत्र्य जपुनी ठेवू या ॥४॥

Thursday, February 10, 2011

Marathi Prem Geet. प्रेम आहे जादुगार

प्रेम आहे जादुगार

या गीताला चाल लावून गायचा प्रयत्न करा. मी लावलेली चाल ऐकायची असेल तर प्रेम आहे जादुगार या लिन्कवर क्लिक करा.

प्रेम आहे जादुगार, प्रेम आहे जादुगार
एका क्षणामधी तूं अचानक
केली कशी किमया,
माझ्यावरी लिलया ॥धृ॥

पाहिले तुला मी पहिल्या प्रथम
परिणामी हृदयी वाजे पडघम
पडला मला
देहभान विसर तिला
मी इथे अन
मन माझे दूर फ़ार ॥१॥

देतेय तूं मजला तूं आभास
आहे जणू तूं जवळपास
बिलगुनी,
विळखा घालुन मला,
जाईल वारं दूर फ़ार ॥२॥

Tuesday, January 25, 2011

Marathi Bhajan प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे

’मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या चालीवर खालील राष्ट्रीय भजन गाता येईल.
प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे

प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे ॥धृ॥

युवकांच्या शक्तीतुनी, सृजनांचा युक्तीतुनी ।
जिद्दीच्या वृत्तीतुनी, ध्येय गाठू दे ॥१॥

अनुशासन रक्तातुनी, हिम्मत बलदंडातुनी ।
चैतन्या श्वासातुनी, सतत वाहू दे ॥२॥

सामाजिक भान आणि, बंधुभाव मनी रुजवुनी ।
सत्त्याची कास धरुनी, स्थैर्य येऊ दे ॥३॥