Sunday, December 4, 2011

चला क्रांती घडवू या

सध्या काळा पैसा ’आत ’ आणा व भ्रष्टाचाराला ’बाहेर’ घालवा, अशा मागण्यांनी जोर पकडला आहे. अशी आंदोलने ज्यांनी सुरु केली आहेत, त्यांची चरित्रे स्वच्छ व पारदर्शक आहेत त्यामुळे त्या व्यक्ती दुसऱ्यांकडे बोट दाखवू शकतात. तीन बोटे त्यांच्या स्वत:कडे निर्देश करीत असलीत तरी ती बोटे त्यांच्यावर आरोप करीत नाहीयेत.
पण सर्व जनांचे तसे नाही. दुसऱ्यावर आरोप करतांना त्या तीन बोटांची जाणीव ठेवलीच पाहिजे, नाही का! माझे गीत सर्वजनांना संबोधित करते. भ्रष्टाचाराचे उच्चाटन स्वत:पासूनच करायला पाहिजे.

चला क्रांती घडवू या

खपतील जीव ओतुनी धरतीत पेरुनी प्राण ।
मातीत घाम मिसळोनी मातीत पिकविती स्वर्ण ॥
चला कृषि क्रांती घडवू या, चला कृषि क्रांती घडवू या ॥१॥
कौशल्य जिद्द जोडुनी गुणवत्तेस वाढवू या ।
आलस्य स्वार्थ त्यागुनी उत्पन्न वाढवू या ॥
उद्योग क्रांती घडवू या, उद्योग क्रांती घडवू या ॥२॥
श्रीमंत सेठ उद्योगी सत्कर्मी राबवती लक्ष्मी ।
कायद्यात राहुनी प्रगतीची शिडी अभिमानी ॥
आर्थिक क्रांती घडवू या, आर्थिक क्रांती घडवू या ॥३॥
तळहाती शिर घेऊनी करतील रिपुवध रणभूमी ।
बाजी जिवाची लावूनी लढतील सैनिक सरहद्दी ॥
चला स्वातंत्र्य जपुनी ठेवू या, चला स्वातंत्र्य जपुनी ठेवू या ॥४॥

No comments:

Post a Comment